लाहरो से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.." या कवितेत कवी हरिवंशराय बच्चन यांचे प्रेरणादायी विचार आहेत. भीती ही अज्ञानातून निर्माण होते, पण त्यावर निव्वळ घरात बसून विचार करणे बोम्ब होईल का? जर भीत्ती दूर सारायची असेल, तर घराबाहेर पडायलाच हवे. हजारो मैलांचा प्रवास हा आत्मविश्वासाने टाकलेल्या पहिल्या पावलांनी सुरू होतो. 'लोकं काय म्हणतील' याची पर्वा न करता धाडसाने सुरू केलेलं अशक्य कार्य तुमच्या हातून शक्य झाल्यावर तेच लोक तुमचा जयजयकार करतील, त्यामुळे अधिक विचार न करता भीतीविरुद्ध लढा देऊन तिला मनातून काढून टाकावे. नेपोलियन बोनापार्ट भीती ठेवून रणांगणात उत्तरले असते, तर पराभव झाला असता. पण तसे झाले नाही. कारण जो आपला कम्फर्टड्रोन तोडून पुढे जातो तोच जिंकतो. अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांनी "yes we can" या जादूई वाक्याला निवडणूक प्रचाराचे सूत्र बनविले आणि विजयश्री खेचून आणली.
प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या कामाची भीती वाटत असते. विद्यार्थ्यांना परीक्षेची तर मोठ्यांना व्यवसायात अपयशी होण्याची. पाण्यात न जाता पोहणे शिकणे शक्य आहे का? अगदी तसेच स्पर्धा परीक्षेत उतरण्यापूर्वीच त्यावर मत व्यक्त करणे योग्य आहे का? नाही ना. "जो चतेल, तोच पडेल" बरोबर! पण जो त्या गोष्टीत पडलाच नाही, तर यश येईल कसे? त्यापेक्षा प्रामाणिकपणे मेहनत केली, तरच यश तुमच्या पायाशी लोळण घातल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात, की प्रयत्न न करणे यापेक्षा दुसरे मोठे अपयश नाही. कुणाशीही आपली तुलना न करता सामोरे जायला हवे. बुद्धिबळाचा बादशहा विश्वनाथन आनंद यांच्याशी तुलना केली असती तर डी. गुकेश या सतरा वर्षीय मुलाने विजय संपादन केला असता का? म्हणून मोकळेपणाने, बिनधास्त आव्हाने स्वीकारायला हवीत.
"मन चिंती, ते वैरीही न चिंती" असं म्हणतात. म्हणून अगोदर मनातील नकारात्मक विचार बाजूला सारा, हिमालयाएवढे उंच शिखर एका दुर्घटनेत एक पाय गमावून बसलेल्या अरुणिमा सिन्हा या दिव्यांग महिलेने सर केले. जगात अशक्य असे काहीच नाही. राहत इंदौरी म्हणतात की, "शाखों से टूट जाये वो पत्ते नहीं है तम, आँधी से कोई कह दे की औकात में रहे, क्योंकी डर के आगे जोत है..."